न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२०) :- मोबाईलचे दुकान फोडून चोरट्यांनी दुकानातून मोबाइल फोन आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख ९७ हजार १९६ रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना लिंकरोड, चिंचवड येथील कुणाल कम्युनिकेशन येथे शनिवारी (दि. १०) पहाटे पाचच्या सुमारास घडली.
राजेश मुरलीधर तोतलानी (४४, रा. पिंपरी) यांनी रविवारी ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लिंक रोड चिंचवड येथे फिर्यादी तोतलानी यांचे दुकान आहे. शुक्रवारी (दि. ९) रात्री साडेआठ वाजता तोतलानी यांनी त्यांचे दुकान कुलूप लाऊन बंद केले.
रात्री चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातून सहा हजार रुपयांची रोकड आणि एक लाख ९१ हजार १९६ रुपयांचे नऊ मोबाइल फोन असा एकूण एक लाख ९७ हजार १९६ रुपयांचा ऐवज चोरून नेला.


















