- आज २४४ जणांना कोरोनाची बाधा तर, १८ जणांचा मृत्यु; ५२० जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. १३ ऑक्टोबर) रोजी २४४ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा १८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ५२० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे ०५ पुरुष भोसरी (६२ वर्षे, ७० वर्षे), पिंपळे सौदागर (८० वर्षे), आकुर्डी (५८ वर्षे), पिंपरी (६१ वर्षे) ०१ स्त्री – चिखली (६४ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०९ पुरुष – म्हाळुंगे (७० वर्षे, ६४ वर्षे), देहूगांव ( ४५ वर्षे), जुन्नर (४६ वर्षे), आंबेगांव (५७ वर्षे), नारायणगांव (६२ वर्षे), माण (५० वर्षे), पारगांव (२९ वर्षे), शिरुर (३४ वर्षे), ०३ स्त्री – खेड (४२ वर्षे), चाकण (८० वर्षे), मंचर (७० वर्षे) रहिवासी आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ८४२७५ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ७९२७८ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १४४७ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.