- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे केले आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑक्टोबर २०२०) :- उद्यापासून प्रारंभ होत असलेल्या घटस्थापना व नवरात्र उत्सवानिमित्त महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यांनी दिलेल्या संदेशात माझे कुंटुंब माझी जबाबदारी हे आपले ब्रीदवाक्य असून प्रत्येक महिला ही स्त्री शक्ती आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरातील माझ्या महिला भगिनींवर त्यांच्या मुलांची, कुटुंबियांची व वृद्ध व्यक्तींची जबाबदारी वाढली आहे. मार्च पासून चालू झालेल्या कोरोना विषाणूचा लढा आपल्या सहकार्यामुळे लढण्यात आपण यशस्वी झालो असलो तरी कोरोना अद्याप संपलेला नाही. मात्र त्याचा प्रभाव कमी झालेला दिसून येत आहे, असे सांगून महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी त्यांच्या संदेशात आगामी काळात घटस्थापना, दसरा, दिवाळीसारखे सण येत आहेत. घटस्थापनेची उद्यापासून प्रतिष्ठापना होत असताना माझी शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की कृपया घटाची स्थापना आपल्या घरीच करावी.
मंडळात काम करावे लागल्यास एक किंवा दोन महिलांनी देवीची सेवा करावी. सण साजरा करतेवेळी कोठेही गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्वांनी मास्कचा वापर करावा तसेच हाताची साबणाने नियमित स्वच्छता करावी असे सांगून महापौर माई ढोरे यांनी सर्वांना कोरोना विषाणूशी लढताना कोरोना बाबत दक्षता घेऊन सहकार्य करणेचे आवाहन केले.