- माजी नगरसेवक जितेंद्र ननावरेंनी पुढाकार घेत केले मृतदेहावर अंतिम संस्कार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरीतील महात्मा फुलेनगरमध्ये एका कामगाराचा ह्रदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी सकाळी मृत्यू झाला होता. परंतु, करोना असेल या भीतीने कामगाराचा मृतदेह पाच ते सहा तास घरातच पडून होता.
मृतदेहाला कोणीही हात लावायला तयार नव्हतं. अखेर माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी पुढाकार घेत मृतदेह बाहेर काढला आणि रुग्णालयात नेऊन शवविच्छेदन करत शुक्रवारी विधिवत अंत्यसंस्कार केले.
प्रसाद कुमार गुप्ता (४२) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. बिहारमधून तो कामानिमित्त पिंपरीत स्थायिक झाला होता. लॉकडाउन झाल्याने गुप्ता कुटुंबाला घेऊन त्याच्या मूळ गावी बिहार येथे गेला. त्यानंतर काही दिवसांनी गुप्ता हा शहरात एकटाच परतला. दरम्यान, गुरुवारी सकाळी त्याचा राहत्या घरात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शेजाऱ्यांनी घराबाहेर का येत नाही हे पाहिले असता त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.
महात्मा फुलेनगरमध्ये गेल्या दोन दिवसापूर्वी बिहार येथून पोटापाण्या साठी आलेल्या कामगाराचा राहत्या घरी मृत्यू झाला. कोविडच्या भीतीमुळे कोणीही म्रुतदेहास हात लावण्यास तयार नव्हते. शेवटी म व माझ्या सहकाऱ्यांनी तो मृतदेह वायसीएम रुग्णालयात हलवला. त्या इसमाचे नातेवाईक गावी असल्याने आम्हीच त्या म्रुतदेहावर अंत्यसंस्कार केले.
– जितेंद्र ननावरे (माजी नगरसेवक, पिं. चिं. मनपा.)