न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑक्टोबर २०२०) :- शासन नियमानुसार कोणत्याही सरकारी कार्यालयात एखादया विभागात ३ वर्षापेक्षा जास्त काळ एखादया कर्मचाऱ्यास ठेवता येत नाही. त्याची इतर विभागात बदली करावी लागते.
मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या कार्यालयात स्थायी समिती सभापतीचे स्विय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे हे चार वर्षापासून काम करित आहेत. पदोन्नतीमुळे लिपिक झालेले दिनेश अटवाल हे गेली १० वर्षे शिपाई म्हणून याच विभागात काम करित आहेत. तर शिपाई म्हणून याच विभागात अरविंद कांबळे हे गेली ६ वर्षे या विभागात काम करित आहेत.
स्थायी समितीत आर्थिक विषयांना मान्यता दिली जाते. त्यामुळे या ३ कर्मचाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध निर्माण होऊ शकतात, म्हणून स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक दिनेश अटवाल व शिपाई अरविंद कांबळे यांची त्वरित दुसऱ्या विभागात बदली करण्यात यावी, अशी मागणी एनएसयुआय चे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विशाल कसबे यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


















