- ‘ह’ प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळेंचा युवकांना सल्ला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ ऑक्टोबर २०२०) :- पिपळे गुरव येथील मयूरनगरी रोड, विनायकनगर येथे रविवार (दि. २६) रोजी दसऱ्यानिमित्त औषधाच्या दुकानाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी ‘ह’ प्रभाग अध्यक्ष व नगरसेवक अंबरनाथ कांबळे, मानवी हक्क संरक्षण आणि जागतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, श्रीदत्त मेडिकलचे मालक नवनाथ खडके, मानवी हक्क संरक्षण आणि पंचायतीच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड, रेणुका जोगदंड, सा.का अंकुश मोरे, सा.का.सुदाम जोगदंड, नितीन जोगदंड, शेषेराव भोसले, विराज जोगदंड, अक्षय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
अंबरनाथ कांबळे यांनी हे स्पर्धेचे युग आहे. तरुणांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता स्व:ताचा व्यवसाय करून देशाच्या विकासाला हातभार लावावा. अत्यंत कमी वयात मेडिकलचा व्यवसाय सुरु केल्याबद्दल सोमेश जोगदंड याचा सन्मान करुन सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन अंबरनाथ कांबळे त्यांनी दिले.