न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. ऑक्टोबर २०२०) :- ‘ क ‘ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्रभाग क्र. २, कुदळवाडी, चिखली येथे महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने मंगळवारी (दि. २७) रोजी अनधिकृत बांधकामावर कारवाई केली.
या कारवाईमध्ये गट न. ९००, ९०१, ९०२ डीपी रोड मधील एकूण २० बाधित अनधिकृत पत्राशेड व बांधकामे (एकूण क्षेत्रफळ अंदाजे २८१४८.१६ चौ.फुट ) यावर कारवाई करण्यात आली.
ही कारवाई कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांचे मार्गदर्शनाखाली, उपभियंता सुर्यकांत मोहिते यांचे सोबत स्थानिक पोलीस बंदोबस्त, महापालिका अतिक्रमण पथक, ०४ जे सी बी, ०२ डंपर, मनपा कर्मचारी व मजूर यांचे सहकार्याने करण्यात आली.


















