न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ डिसें.) :- निगडीतील केंब्रिज champs इंटरनेशनल स्कूल च्यावतीने शनिवार (दि. १) रोजी ‘आई मला खेळायला जाऊ दे’ या सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शाळेचे अध्यक्ष धनंजय वर्णेकर, संचालक राम रैना, मुख्याध्यापिका सोनाली खोत, शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी आदी उपस्थित होते. शाळेच्या नवीन व भव्य मैदानात या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यात मुलांसाठी खो-खो, टिपरी-पाणी, लंगडी, दगडपाणी, आईचे पत्र हरवले आदी पारंपारिक खेळाचे आयोजन करण्यात आले होते.
मुलांना विद्यार्थी दशेतच कणखर बनविण्यासाठी मैदानी खेळ खेळण्यास प्रवृत्त केले पाहिजे, जेणेकरून तरुणवयात मुलांची रोग प्रतिकार शक्ती कणखर होईल व त्यांना येणाऱ्या संकटांचा सामना करणे सोपे होईल. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी या प्रकारचे मैदानी खेळ खेळले पाहिजेत, असे शाळेचे अध्यक्ष धनंजय वर्णेकर यांनी मत व्यक्त केले.












