न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑक्टोबर २०२०) :- देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी तसेच ती दृढ करण्यासाठी निष्ठापुर्वक काम करण्याची शपथ आज महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या उपस्थितीत अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांनी घेतली.
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच भारताच्या माजी प्रधानमंत्री दिवंगत भारतरत्न इंदिरा गांधी यांचा स्मृतीदिन, महर्षी वाल्मिकी आणि माजी गृहमंत्री भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचा कार्यक्रम देखील यावेळी संपन्न झाला. यांच्या प्रतिमेस महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी एम. एम. शिंदे, तक्रार निवारण समिती उपाध्यक्ष ऍड. सागर चरण, आरोग्य निरिक्षक सुरेश चन्नाल, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष गणेश भोसले, अखिल वाल्मिकी समाज पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष राजू परदेशी, उपाध्यक्ष कुणाल बैद, कार्याध्यक्ष राजू खैरे, प्रदेश कार्यकारीणी महासचिव नरेंद्र टांक, सदस्य अनिल लखन, नरेश गुहेर, चमन मरोठिया, माजी अध्यक्ष सोमनाथ वैद, व कर्मचारी उपस्थित होते.
कधीही हिंसाचाराचा अवलंब करणार नसल्याची शपथ यावेळी घेण्यात आली. तसेच सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद अथवा तंटे किंवा इतर राजकीय वा आर्थिक गा-हाणी शांततामय आणि सांविधानिक मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न चालू ठेवण्याची प्रतिज्ञा देखील यावेळी घेण्यात आली. माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी प्रतिज्ञा पत्राचे वाचन केले.
काळेवाडी येथील कचराकुंडीत कर्मचारी नितीन सुर्यवंशी यांना साफसफाई करताना जिवंत अर्भक आढळून आले. त्यांनी सामाजिक कर्तव्य निष्ठेतून सापडलेल्या अर्भकाला तात्काळ जिजामाता रुग्णालयात दाखल केल्याने अर्भकाचे प्राण वाचले. यासाठी कर्मचारी नितीन सुर्यवंशी व आरोग्य निरिक्षक सुनिल वाटाडे यांचा महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
तदनंतर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, वैद्यकीय अधिष्टाता डॉ. राजेंद्र वाबळे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. शंकर जाधव, प्रशासन अधिकारी दिलीप करंजखेले, तक्रार निवारण समिती उपाध्यक्ष ऍड. सागर चरण, आरोग्य निरिक्षक राजकुमार वाघमारे, आरोग्य मुकादम तुकाराम लांडगे, सचिन उघडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष गणेश भोसले, अखिल वाल्मिकी समाज पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष राजू परदेशी, उपाध्यक्ष कुणाल बैद, कार्याध्यक्ष राजू खैरे, प्रदेश कार्यकारीणी महासचिव नरेंद्र टांक, सदस्य अनिल लखन, नरेश गुहेर, चमन मरोठिया व कर्मचारी उपस्थित होते.
महर्षी वाल्मिकी, सरदार पटेल जयंती़ व भारतरत्न इंदिरा गांधी पुण्यतीथी निमित्त पालिकेचे अभिवादन…