न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज सोमवारी (दि. ०२ नोव्हेंबर) रोजी ११३ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेला १ पुरुष रुग्ण हा वल्लभनगर (७५ वर्षे) येथील रहिवासी आहे. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण ०१ पुरुष – खेड ( ६८ वर्षे ), स्त्री ०१ खेड ( ६५ वर्षे ) येथील रहिवासी आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ८७९९६ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८४७१० वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १५२९ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.