- महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची वाहनेही होणार जमा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. नोव्हेंबर २०२०) :- राज्यातील ५ विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. औरंगाबाद पदवीधर, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक, पुणे शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
त्यामुळे आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत देखील महापौर, उपमहापौर, विषय समिती सभापतीची वाहने जमा करण्यात आली आहेत. तर खासगी वाहने वापरणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या खासगी वाहनांच्या पाट्या व दालनाच्या पाट्या झाकल्या आहेत, अशी माहिती नगरसचिव उल्हास जगताप दिली.
या पाचही जागांसाठी १ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. जुलै महिन्यात या जागांची मुदत संपली होती. मात्र कोरानामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील रिक्त ५ जागांसाठी निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले आहे. या निवडणुकीची अधिसूचना ५ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार असून १२ नोव्हेंबर पर्यंत अर्ज स्वीकृती होणार आहे. प्राप्त अर्जांची छाननी १३ नोव्हेंबरला तर अर्ज मागे घेण्याची मुदत १७ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.