न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ डिसें ) :- पिंपरी चिंचवड येथील नॉव्हेल इंटरनेशनल स्कूल मध्ये शनिवार (दि. ८) रोजी रुबेला लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या शाळेत LKG पासून ते सहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील प्रशिक्षित आरोग्य कार्यकर्त्यांद्वारे लस टोचण्यात आली. या अभियानाला शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
यावेळी पिं.चिं. प्रभाग क्रमांक १० च्या नगरसेविका श्रीमती अनुराधा गोरखे, नॉव्हेल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे, प्राचार्या डॉ. कांचन देशपांडे, डॉ. प्रिया गोरखे, आकुर्डी रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता साळवे, संभाजीनगर रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिदास शेंडे, तसेच आकुर्डी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वला पगारे आदी उपस्थित होते.
नगरसेविका अनुराधा गोरखे म्हणाल्या की, एका राष्ट्रव्यापी अभियानाद्वारे शाळा आणि बाह्यसंपर्क सत्राच्या माध्यमातून गोवर आणि रुबेला पासून बालकांचे रक्षण करणाऱ्या गोवर-रुबेला (MR) लसीकरण मोहिमेचा प्रारंभ झालेला आहे. गोवरचे दूरीकरण आणि रुबेलाचे नियंत्रण करण्यासाठी ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना एमआर ची लस टोचणे अत्यावश्यक आहे.
शाळेच्या वैद्यकीय परिचारिका पूनम थोरात यांनी संपूर्ण व्यवस्थापन पहिले












