न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ डिसें ) :- खासदार श्रीरंग बारणे लिखित ‘आपला वैशवशाली मावळ लोकसभा मतदारसंघ’ पुस्तकांचे प्रकाशन शनिवारी (दि. ८ ) रोजी खासदार संजय राऊत यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी खासदार संजय राउत, संपर्क प्रमुख बाळा कदम, खासदार श्रीरंग बारणे, डाॅ. रामचंद्र देखणे, आमदार गाैतम चाबुकस्वार, शहराध्यक्ष योगेश बाबर, गजानन चिंचवडे, वैशाली सुर्यवंशी, सुलबा उबाळे, प्रमोद कुटे, अनंत को-हाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
लोकशाही मंदिरात दुर्जनाची संख्या वाढत चाललीय, अशी खंत डाॅ. देखणे यांनी व्यक्त केली, यावर खासदार राऊत म्हणाले की, लोकशाही मंदिरात दुर्जन लोक निवडून येतात. ही लोक कोण निवडून देते, लाटेवर स्वार होणारी माणसं निवडून देणे थांबवित नाही, तोपर्यंत हे दुर्जन लोक निवडून येणे थांबणार नाही, या लाटेवर ग्रामपंचायतीची कधी निवडणूक न लढवलेली माणसं देखील खासदार झाली, आता ज्यांच्यावर जास्त गुन्हे तो नगरसेवक निवडून येवू लागला आहे. आपण कोणाला निवडून देतो, हे मतदारांनी बघायला हवे, त्यामुळे हे लोकशाहीचे मंदिर आता रहिलेले नसून टोलेजंग माणसं देशाच्या राजकारणात उरली नाहीत, असेही राऊत यावेळी म्हणाले.
यावेळी डाॅ. रामचंद्र देखणे, खासदार श्रीरंग बारणे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मावळचे संपर्क प्रमुख गजानन चिंचवडे यांनी केले.












