न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ डिसें ) :- सांगवी येथील झालेल्या कार्यक्रमात अजित पवार यांच्या सोबत पार्थ पवार हे दिसले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यावेळी अजित पवार आणि पार्थ पवार हे एकाच व्यासपीठावर होते. निमित्त होतं ते सांगवी मधील जॉब फेअर कार्यक्रमाचे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, मुलगा पार्थ पवारसह राष्ट्रवादीचे अनेक मान्यवर देखील उपस्थित होते.
पार्थ पवार हे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव आहेत. मावळ लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात आहे. पार्थ पवार यांच्या राजकारणात प्रवेशासाठी राष्ट्रवादीकडून पेरणी सुरु झाली आहे. आधी शरद पवार यांच्यासोबत दौरा केल्यानंतर आता पार्थ अजित पवार यांच्यासोबत एकाच व्यासपिठावर दिसले. त्यामुळे मावळ लोकसभा निवडणुकीत त्यांची एन्ट्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा १२ डिसेंबर रोजी वाढदिवस असल्याने, पिंपरी-चिंचवड शहरात फलक लागले असून, त्यावर पार्थ पवार यांचे फोटो झळकत आहेत. या सर्व घडामोडीमुळे विरोधकांना मात्र धडकी भरत आहे.












