- नितीश १२९ जागांवर आघाडीवर तर तेजस्वी १०४ जागांसह पिछाडीवर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० नोव्हेंबर २०२०) :- बिहारमध्ये आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये सुरुवातीला तेजस्वी यादव यांच्या राजद-काँग्रेस आघाडीने मुसंडी मारलेली असताना अचानक एनडीएने कमबॅक करत जवळपास १३० जागांवर आघाडी मिळविली आहे. मात्र, निवडणूक आयोगाने रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरु राहणार असल्याचे सांगत सर्वच पक्षांचे टेन्शन वाढविले आहे.
महत्वाचे म्हणजे सध्या सुरु असलेल्या फेऱ्यांमध्ये अनेक उमेदवारांना ५,८, ३२ ते ३००० मतांचे लीड मिळालेले आहे. मात्र, हे लीड कधीही तुटण्याची शक्यता असून सध्या सुरु असलेली बाजी कधीही पलटणार आहे.
सध्याच्या कलानुसार भाजपा ७७, राजद, ६७, जदयू ४४, काँग्रेस १८ आणि एलजेपी ५ व अन्य ९ अशी आघाडी दिसत आहे. मात्र, यापैकी १४ जागांवर ५,८, ३२ ते ५०० चे लीड उमेदवारांना मिळालेले आहे. यापैकी बऱ्याचशा जागा या नितीशकुमारांच्या जदयू आणि भाजपाच्या आहेत. एनडीएसह राजदचे उमेदवार ५, ८, ३२ अशा मतफरकाने आघाडीवर आहेत. हा फरक काही मतांचा असल्याने मतांच्या पॉकेटवर सारे गणित ठरणार आहे.


















