न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ डिसें ) :- महापालिकेच्या रावेत येथील सेक्टर २३ मधील जलशुद्धीकरण केंद्र पंपिंग स्टेशनमधील तातडीची कामे केली जाणार असल्याने गुरुवारी व शुक्रवारी शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
सेक्टर २३ मधील जलशुद्धीकरण केंद्रातील पाणीपुरवठा विभाग आणि विद्युत विभागातील नियमित दुरुस्ती १३ डिसेंबरला करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व भागातील गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच १४ डिसेंबरचा सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.












