न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. ८ डिसें) :- माजी केंद्रीय कृषिमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल वाकडकर सोशल फाउंडेशनच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर तसेच नितीन काकडे फाऊंडेशन आयोजित भव्य १ ली राज्यस्तरीय कराटे स्पर्धा उद्या होणार आहे. रविवार दिनांक ०९ डिसेंबर रोजी वाकड येथील संत तुकाराम गार्डन मंगल कार्यालय येथे सकाळी १०.३० पासून स्पर्धेस सुरुवात होणार आहे.
या स्पर्धेस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे, आयोजक विशाल वाकडकर यांनी सांगितले आहे.












