पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात घरकाम महिला सभा वतीने रक्षा बंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी धुणी-भांडी, स्वयंपाक, साफसफाई कामगार महिलांनी आर.टी.ओ.अधिकारी आणि कर्मचारी यांना राखी बांधून रक्षा बंधनाचा कार्यक्रम साजरा केला. तसेच आर टी ओ अधिकारी यांनी वाहतूक नियम पाळण्याची पट्टी महिलांना बांधली व सुरक्षा नियम पाळण्याची शपथ घेण्यात आली.
हा रक्षा बंधन नसून सुरक्षा बंधन आहे, असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी केले यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे, घरकाम महिला सभा अध्यक्षा आशा कांबळे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. सुबोध मेडसीकर , मोटार वाहन निरीक्षक रघुनाथ कन्हेरकर, श्री.चंद्रकांत जावळकर, श्री. सचिन विधाते, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संदीप गोसावी, दत्तात्रय सनगर, कु.अर्चना सो.घाणेगांवकर आदी उपस्थित होते.
धुणी-भांडी,स्वयंपाक,साफ-सफाई आदी कामे करणाऱ्या महिलांचा राहणीमान उंचवण्यासाठी आणि त्यांना आर्थिक मार्गदर्शन केले जात आहे, या निमित्ताने कष्टकरी महिलांनी, आर.टी.ओ.कार्यालयात जाऊन राखी कार्यक्रम घेतला. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील म्हणाले, रस्ते सुरक्षा नियम न पाळल्यामुळे अपघात होत आहेत,महिलांनी ठरवले तर अपघातास आळा बसू शकतो
यावेळी सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडसीकर म्हणाले रक्षा बंधन निमित्त सुरक्षा बंधन हा अनोखा उपक्रम आज पिंपरी-चिंचवड आर.टी.ओ. कार्यालयात साजरा होत आहे रक्षा बंधनाएवढेच सुरक्षेला महत्त्व देण्याचे आवाहनही त्यांनी केले.











