चिंचवडेनगर येथील जय महाराष्ट्र चिकन सेंटर मध्ये गॅस सिलेंडरला अचानक आग लागली. अनेक प्रयत्न केल्यानंतरही आग आटोक्यात येईना त्यामुळे चिकन सेंटरच्या मालकाने तो गॅस मोकळ्या जागेत ठेवला. त्यामुळे बघ्यांची गर्दी जमली.
परंतु गर्दीतीलच एका सुजाण नागरिकाने तात्काळ प्रसंगावधान होऊन आग्निशामक दलाच्या हेल्पलाईनवर केला. आग्निशामक दलही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तातडीने आग विझवण्यात आली त्यामूळे जिवितहानीचा मोठा प्रसंग टळला.
प्रभागातील नगरसेवकाशी संपर्क साधला असता त्यांचा फोन सतत व्यस्त लागत होता.











