- मोशी-वाकड-हिंजवडी परिसरातून तीन दुचाकी चोरीला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२०) :- मोशी-वाकड आणि हिंजवडी परिसरातून तीन दुचाकी चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात सोमवारी (दि. २३) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वाहन चोरीच्या पहिल्या घटनेत ऋषिकेश हनुमंत लोखंडे (वय २४, रा. जाधववाडी, चिखली) यांनी बुलेट चोरीबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोखंडे यांची बुलेट मोशी मधील स्पाईन सिटी मॉल समोरून चोरून नेली. वाहन चोरीच्या दुसऱ्या घटनेत महारुद्र शंकर सरकाळे (वय ३९, रा. सुदर्शन कॉलनी, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सरकाळे यांची १५ हजार रुपये किंमतीची एमएच – १४ डीक्यू -०५०३ ही दुचाकी अज्ञात चोरट्यांनी रविवारी (दि. २२) रात्री आठ ते साडेआठ वाजताच्या सुमारास डांगे चौक, वाकड येथून चोरून नेली. वाकड पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक अविनाश पवार याबाबत अधिक तपास करीत आहेत.
वाहन चोरीच्या तिसऱ्या घटनेत लक्ष्मण रामदास बांदल (वय २४, रा. पारखेवस्ती, माण, ता. हवेली) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बांदल यांची २५ हजार रुपये किंमतीची एमएच – १४ – केयु -७७८० ही दुचाकी अज्ञात चोरट्यांनी रविवारी (दि. २२) दुपारी दोन ते रात्री नऊ या कालावधीत हिंजवडी फेज तीन मधील टीसीएस कंपनीच्या गेट जवळील पार्किंगमधून चोरून नेली.