न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२०) :- सहा वर्षांपूर्वी जाणीवपूर्वक अपघात करून भावाला मारले असल्याच्या संशयावरून दारूच्या नशेत आरोपीने एकाला चाकूने भोकसले. उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. १५) सायंकाळी सहा वाजता ओटास्किम, निगडी येथे घडली. घटनेनंतर आरोपी कर्नाटक राज्यात पळून जाण्याच्या तयारीत होता.
निगडी पोलिसांनी त्याचा पाठलाग करून आरोपीला कर्नाटक राज्याच्या सीमेवरून अटक करण्यात आली आहे. दौलत शरमुद्दीन बागवान (वय ४० रा. ओटास्किम, निगडी) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या प्रकरणी प्रकाश तुकाराम शिंगे (वय ४०, रा. ओटास्किम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी दौलत मित्रासोबत गप्पा मारत होते. त्यावेळी आरोपी प्रकाश शिंगे दारू पिऊन तिथे आला. त्याने घरगुती वापराच्या चाकूने दौलत यांना भोकसले. यात गंभीर जखमी झालेल्या दौलत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुन्हा घडल्यानंतर आरोपी शिंगे पळून गेला.
पोलीस कर्मचारी नागेंद्र बनसोडे, होनमाने यांना माहिती मिळाली की, आरोपी कर्नाटक राज्यात पळून जाण्याच्या तयारीत आहे. पोलिसांनी थेट राज्याच्या सीमेवर सापळा लावून प्रशांत शिंगे याला ताब्यात घेतले. प्रशांत शिंगे यांचा भाऊ मल्लेश तुकाराम शिंगे (वय १७) याला सन २०१४ साली मयत दौलत यांचा भाऊ दस्तगीर शमशुद्दीन बागवान याने जाणीवपूर्वक अपघात करून मारले असल्याचा राग आरोपी प्रशांत याच्या मनात होता.