न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२०) :- दोडमने आणि खवले यांच्यात परिसरातील वर्चस्व वादातून मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे. बुधवारी रात्री ते दोघे एकमेकांच्या समोर आले. त्याच्यात रात्री भांडण झाले. याच वादातून बुधवारी रात्री सव्वा आकराच्या सुमारास ओटास्कीम बिल्डींग ३ व ४ समोर हा प्रकार घडला.
किरण खवले हा त्याचे सहा, सात साथीदार हत्यारे घेऊन तेथे आला. यावेळी झालेल्या वादातून आकाश दौडमनी (३०, रा. ओटास्कीम, निगडी) याच्यावर गोळीबार करण्यात आला असून त्याच्या पायाला गोळी लागली आहे. तर आकाशचा भाऊ रवी याला दगडाने आणि दांडक्याने मारहाण करुन जखमी केले आहे. घटनेची माहिती मिळताच निगडी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यातील संशयित चार जणांना ताब्यात घेतले आहे.
——-