न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२०) :- वाढीव वीज देयकाविरोधात आज मनसेकडून पुण्यामध्ये मोर्चा काढण्यात आला. मनसेच्या वतीने शनिवारवाडा ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन केलं होतं. मोर्चाला सुरुवात होण्याआधीच पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली. काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे फरासखाना पोलीस स्टेशनच्या आवारात मनसे कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. काही वेळानंतर कार्यकर्त्याची सुटका करण्यात आली. यात पिंपरी चिंचवड मनसे अध्यक्ष सचिन चिखलेसह पदाधिकारी व मनसैनिक सहभागी झाले होते.