न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ नोव्हेंबर २०२०) :- पंडित नेहरू यांनी भारताची उभारणी करण्यामध्ये मोलाचा वाटा उचललेला आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन तसेच तंत्रज्ञानासाठी पायाभूत योजनांमध्ये भारताला सक्षम केले व भारत समृद्ध करण्यासाठी प्रयत्न केले. स्वातंत्र्यानंतरच्या भारताची उभारणी करण्यामध्ये पंडित नेहरूंचे योगदान मोठे असल्याचे प्रतिपादन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष ॲड. अभय छाजेड यांनी केले.
चाचा नेहरू यांच्या १३१ व्या जयंती प्रित्यर्थ १४ नोव्हेंबर बाल दिनानिमित्त “झेप फुलपाखरांची” ह्या नूतन बालकवींचा प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड, प्रतिभा महाविद्यालय चिंचवड आणि सोनद सेवा प्रबोधिनी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकाशन व काव्यवाचन समारंभ ऑनलाईन आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर दीपक शहा, (सचिव प्रतिभा शैक्षणिक संकुल) हे होते. ॲडव्होकेट अभय छाजेड (अध्यक्ष पुणे जिल्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांच्या हस्ते व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.


















