न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२०) :- पिंपरीतील बौद्धनगर परिसरात राजरोसपणे सुरू असलेल्या जुगार अड्यावर गुरुवारी (दि. २६) पोलिसांनी छापा टाकला. तेथून १६ हजाराचे साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी नरेंद्र खटवाणी (रा. पिंपरी) आणि जुगार मालक दिनेश मेवाणी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरीत सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी बौद्धनगर, परिसरातील रुम नंबर ३ येथे काही जण जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. तेथून ११ हजार ३५० रुपयांची रोकड, ५ हजार रुपयांचा मोबाईल असा १६ हजारांचा ऐवज जप्त केला असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी दिली.