- भोसरीतील अण्णासाहेब मगर बँकेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ डिसेंबर २०२०) :- भोसरीतील अण्णासाहेब मगर सहकारी बँकेचा वर्धापन दिन मंगळवारी (दि. ०१) रोजी मोठ्या उत्साहात शासनाच्या कोविड १९ संदर्भातील नियमांचे पालन करुन साजरा करण्यात आला. यावेळी बँकेस सदिच्छा भेट देणाऱ्या सभासदांना प्रवेश करतेवेळी सॅनिटाझर देऊन ’मास्क वापर व सोशल डिस्टंसनची अंलबजावणी करण्यात आली.
बँकेच्या वर्धापन दिनाचे निमित्ताने खेड विधानसभेचे आमदार दिलीप अण्णा मोहिते, भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादीचे शहराध्क्ष संजोग वाघेरे, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, जेष्ठ माजी नगरसेवक शंकरराव पांढरकर, नगरसेवक अजित गव्हाणे, अनुराधा गोफने, विकास डोळस, नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक निलेश पांढरकर, धनंजय आल्हाट, हिंद केसरी अमोल बुचडे, वस्ताद धोंडिबा लांडगे, हवेली बँकेचे अध्यक्ष संजय बोराटे, भोसरी कलाक्रिडा अध्यक्ष विजय फुगे, वैष्णव विचार मंचचे भाऊसाहेब लांडे, देवीदास फुगे, संतोष उदावंत, उद्योजक संतोष बारणे, दत्तात्र मोकाशी, नितीन सस्ते, माजी संचालक सीए चेतन आहेर, सुनिल हुलावळे, अनिल दोडके, तसेच विलास खांदवे, बाळासाहेब लांडे, शामराव लांडगे, सुरेश काळजे आदींनी बँकेवर शुभेच्छांचा वर्षाव केला.
यावेळी बँकेचे मार्गदर्शक व माजी अध्यक्ष नंदकुमार लांडे, अध्यक्ष प्रा. राजेश सस्ते, उपाध्क्ष मनोज बोरसे, संचालक अॅड. घनशाम खलाटे, सुलोचना भोवरे, गणेश पवळे, विज गवारे, सविता मोहरुत, सोनल लांडगे, दिपक डोळस, अॅड बाळासाहेब थोपटे, कार्यकारी अधिकारी गजानन कुलकर्णी आदी उपस्थित होते.
आ. महेश लांडगे म्हणाले, अण्णासाहेब मगर बँकेने सभासदांचा व ठेवीदारांचा विश्वास संपादन केल्यामुळे बँक सुस्थितीत प्रगतीकडे वाटचाल करत आहे. बँकेच्या भविष्यातील वाटचालीस शभेच्छा देऊन बँकेच्या कामकाजाबद्दल गौरवोग्दार काढले.
आ. मोहिते म्हणाले की, सहकारी बँकींग क्षेत्रास सध्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा अडचणीच्या काळात सभासद व ठेवीदारांनी अण्णासाहेब मगर बँकेवर जो विश्वास दाखविला आहे तो उल्लेखनिय आहे. त्यामुळे बँकेची भविषतील प्रगती नक्कीच उज्वल असेल.