न्यूज पीसीएमसी नेटवर्क
औंध (दि. ११ डिसें.) :- प्रभाग क्रमांक ८ औंध-बोपोडीतील माता रमाबाई आंबेडकर शाळेपासुन ते माऊंट वर्ड सोसायटी परिसरात विविध कामांचे भूमिपूजन नगरसेविका सुनिता वाडेकर यांच्या वॉर्डस्तरीय निधीतून करण्यात आले.
या परिसरात रस्त्याचे डांबरीकरण व नवीन ड्रेनेज पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. त्या कामांचा उदघाटन समारंभ नगरसेविका सुनिता वाडेकर, नगरसेवक प्रकाश ढोरे, विजय शेवाळे, आरपीआय (A) नेते परशुराम वाडेकर यांच्या हस्ते पार पडला.
कार्यक्रम प्रसंगी आरोग्य विभाग ASI वासनकर मॅडम, मुकादम गौतम वाघमारे, आर.पी.आय.चे पदाधिकारी रोहित अडसूळ, भिमराव वाघमारे, जेवेल आंटोनी, महादेव साळवे, भीमा गायकवाड, अविनाश कदम आण्णा आठवले, काका कांबळे, मारुती भालेराव, आप्पा वाडेकर, महिंद्र निकाळजे, किशन गलेल्लू, पुरुषोत्तम कांबळे,रूपेश भालेराव, नंदाताई निकाळजे, साजूताई पिल्ले, राजश्री कांबळे तसेच या परिसरातील महिला कार्यकर्त्या व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












