न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ डिसेंबर २०२०) :- मित्राच्या वाढदिवसाला जायचे असल्याचे सांगून तरुणीला रिक्षातून एका बारमध्ये नेले. तिथे तिला बिअर पाजली. त्यानंतर गुंगी आलेल्या तरुणीला घरी सोडण्याच्या बहाण्याने दिघी येथील डोंगरावर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. हा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि. ५) रात्री घडला. आकाश कापुरे (रा. दिघी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीडित तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश याने पीडित तरुणीसोबत जवळीक वाढवून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर मित्र विशाल पाटील याच्या वाढदिवसाला जायचे असल्याचे सांगून आकाश याने तरुणीला रिक्षात बसवून शिवाजीनगर येथील प्रतीक बारमध्ये नेले. तिथे तिला बिअर पाजली. त्यामुळे तरुणीला गुंगी आली.
तरुणीला घरी सोडविण्याच्या बहाण्याने आकाश याने तिला दिघी येथील डोंगरावर नेले. तरुणीला गुंगी आल्याचा गैरफायदा घेऊन आकाश याने तिच्यावर बलात्कार केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.















