- वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या लॉज मालकांसह कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ डिसेंबर २०२०) :- भोसरी परिसरात पोलिसांनी ३ लॉजवर छापेमारी करून आठ जणांना ताब्यात घेतले असून वेश्या व्यवसाय करणाऱ्या तरुणींची सुटका केली आहे.
भोसरीतील धावडे वस्तीच्या साईराज लॉजवर छापा टाकून चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. प्रशांत राजीव शेट्टी (वय ४५), चेतन राजू पुजारी (वय ३२), प्रशांत मैलगिरी (तिघे रा.धावडे वस्ती, भोसरी), प्रकाश शेट्टी (रा. हडपसर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यातील प्रशांत आणि चेतन या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी प्रकाश शेट्टी याचा हा लॉज असून तो अन्य तीन आरोपींकडून लॉजमध्ये वेश्या व्यवसाय करून घेत होता.
शास्त्री चौकातील सूर्या हॉटेल अँड लॉज येथे प्रशांत मुरलीधर फाळके (वय ४०, रा. भोसरी, मूळ रा. बुलढाणा), ज्ञानेश्वर श्रीराम फाळके (वय ४३, रा. भोसरी, मूळ रा. बुलढाणा), परमेश्वर रावसाहेब इंगळे ( वय ४३, रा. भोसरी, मूळ रा. लातूर) या तिघांना अटक केली आहे. हे आरोपी सूर्या हॉटेल बार अँड लॉज ( सन लॉज अँड म्युझिक अँड डिस्को लाईट हॉल) येथे वेश्या व्यवसायासाठी ग्राहक आणून तरुणींकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत होते.
भोसरीतीलच शास्त्री चौकातील वनराज हॉटेल बार रेस्टोरेंट व लॉजिंग येथे विश्वनाथ भौजा शेट्टी (वय ५६, रा. भोसरी), सीताराम रामण्णा शेट्टी (वय ५०, रा. पिंपरीगाव), कुबैर फकीरमा पात्रोट (वय ४८, रा. भोसरी) या तिघांना अटक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत













