न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ डिसेंबर २०२०) :-पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात विविध ठिकाणी फिरते शौचालय ठेवण्यात आले आहे. निगडी येथील चिकन चौकाजवळ देखील एक फिरते शौचालय ट्रॉली (एमएच-१४-एझेड-९८९५) ठेवण्यात आली आहे.
३ डिसेंबर रोजी दुपारी सव्वातीन ते ४ डिसेंबर सकाळी सात या कालावधीत चोरट्यांनी ९५ हजार रुपये किमतीचे शौचालय आणि ट्रॉली चोरून नेली. महेश नानासाहेब आढाव (वय ४२, रा. आनंदनगर, जुनी सांगवी) यांनी याबाबत सोमवारी (दि. ७) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.