न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड शहरातून अज्ञात चोरट्यांनी दोन चारचाकी वाहने तसेच पाच दुचाकी चोरून नेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
याबाबत सोमवारी (दि. ७) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी मयूर रवींद्र गोदाम (वय ३१, रा. मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात, गणेश शंकर धुरंधरे (वय ३५, रा. लांडेवाडी, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात, रवींद्र बुटे (वय ३० , रा . बुटेवाडी , ता . खेड ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात आणि जुनैद आशिक अन्सारी ( वय २३ , रा . रुपीनगर, तळवडे, मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गोदाम यांची २० हजारांची, धुरंदरे आणि बुटे यांची प्रत्येकी १५ हजारांची तर, अन्सारी यांची ३५ हजारांची दुचाकी चोरीला गेली आहे. योगेश बलजित सिंगजाटव (वय ४१, रा. भोसरी) आणि चेतन चंद्रकांत घोडे (वय ३२, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांचे मित्र सुनील मोतीराम इंगोले (वय ४६) यांच्या मालकीची ३५ हजारांची दुचाकी फिर्यादी वापरत होते. फिर्यादी यांनी उद्यमनगर, पिंपरी येथील एटीएम समोर दुचाकी लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. अनिल हुकूमचंद अगरवाल (वय ४९, रा. निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांना लग्नात मिळालेली चार लाख ८५ हजारांची चारचाकी अज्ञात चोरट्यांनीचोरून नेली. हा प्रकार सोमवारी (दि. ७) सकाळी उघडकीस आला. चेतन चंद्रकांत घोडे (वय ३२, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.