न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसेंबर २०२०) :- येत्या १४ डिसेंबरपासून बँकिंगशी निगडीत एका नियमामध्ये बदल होणार आहे. दरम्यान, या बदलणाऱ्या नियमाचा ग्राहकाना मोठा फायदाही होणार आहे.
१४ तारखेपासून रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंटची (RTGS) सुविधा २४ तास मिळणार आहे. ग्राहकांना आरटीजीएसद्वारे ३६५ दिवस कोणत्याही वेळी पैसे पाठवता येणार आहेत.
ऑक्टोबर महिन्यात RTGS ची सुविधा २४ तास करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला होता. ही सुविधा २४ तास सुरू झाल्यानंतर ज्यांच्याकडे २४७३६५ लार्ज व्हॅल्यू रिअल टाईम पेमेंट सिस्टम असलेल्या जगातील अवघ्या काही देशांच्या भारत सामील होणार असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं होतं. सध्या RTGS ची सुविधा दुसरा आणि चौथा शनिवार आणि सर्व रविवार सोडून कामकाजाच्या इतर दिवशी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळात उपलब्ध आहे.