न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसेंबर २०२०) :- जागतिक मानवी हक्क दिनाचे औचित्य साधून ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन च्या मुख्य कार्यालय वर्ल्ड ऑफ मदर आकुर्डी येथे मानवी अधिकार कार्यकर्ते नागरिक यांच्यासाठी मानवी हक्क याविषयी मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी.चौधरी upsthit होते. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले मानवी हक्क विषयी शासकीय यंत्रणेमध्ये अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत ते दूर करून मानवी हक्काची जोपासना करण्याची जबाबदारी आता मानव अधिकार कार्यकर्त्यांना पार पाडावे लागणार आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांना भारतीय राज्यघटनेत जे प्रदान केलेल्या मानवी हक्क विषयी जागृती करण्याची नितांत गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
संघटनेचे राष्ट्रीय कायदे सल्लागार ॲड. अनिल कुमार जाधव यांनी समाजातील प्रत्येक नागरिकाने जागृत होऊन आपल्या हक्कासाठी संविधानिक पद्धतीचा वापर केला पाहिजे, असे सांगितले.
संघटनेचे राष्ट्रीय सचिव डॉक्टर जावेद शिकलगार यांनी ग्राम न्यायालय अधिनियम २००८ च्या तरतुदी विषयी मार्गदर्शन करून राज्य शासनाने ग्राम न्यायालयाची स्थापना त्वरित करावी जेणे करुन न्यायालयाचे कामकाज ग्रामीण नागरिकांसाठी खुले होण्याबरोबरच न्यायालयीन प्रलंबित खटल्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. असे सांगितले यावेळी संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तानाजी मांडवे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी कायदे नियम नियमावली यांचा अभ्यास करून आपले म्हणणे मांडायला शिकले पाहिजे असे यावेळी मत व्यक्त केले.
यावेळी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष देवकर, उपाध्यक्ष ओंकार शेरे, सचिन गाडे, जनसंपर्क अधिकारी लक्ष्मण दवणे, रुकसाना शेख, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष कैलास वाघमारे, रशीद खान सलीम सय्यद, सतीश घावटे मर्दान, सतीश सिलम उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष रघुनाथ रोकडे यांनी केले तर, आभार प्रदर्शन संतोष शेटे यांनी केले.