न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसेंबर २०२०) :- वीजबिल दरवाढीविरोधात मनसेने वीजबिलांची होळी करून आंदोलन केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे काटेपुरम चौक, पिंपळे गुरव येथे लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करण्याबाबत धरणे आंदोलन करण्यात आले. हप्त्याने नाही आणि महिन्यांनी नाही, लॉकडाऊन काळातील वीज बिल भरायला आम्हाला जमणार नाही. ‘वीजबिल माफ करा, नाहीतर खुर्ची खाली करा’ असे या वेळी घोषणा देण्यात येत होते.
येथील अनेक नागरिकांनी वीजबिलाची झेरॉक्स मनसेकडे प्राप्त केल्या आहेत. या विजबिलाबाबत संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन विचारणाही केली आहे. या वेळी जमा झालेल्या वीजबिलांची त्याठिकाणी होळी करण्यात आली. याप्रसंगी प्रशासनाचे सर्व नियमांचे करीत काही मोजक्याच पदाधिकाऱ्यांसोबत या वेळी धरणे आंदोलन करण्यात आले, अशी माहिती आंदोलनाचे आयोजक मनसे पिंपरी चिंचवड उपविभाग अध्यक्ष अनिल भुजबळ, प्रभाग अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी या वेळी सांगितले.
याप्रसंगी मनसे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष राजू सावळे, उपविभाग अध्यक्ष सुरेश सकट, वार्ड अध्यक्ष प्रकाश हादवे, शाखा उपाध्यक्ष गोविंद वाल्हेकर, मनसे सदस्य विजय खंदारे, राहुल खंदारे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सांगवी वरिष्ठ पोलीस रंगनाथ उंडे यांच्या आदेशानुसार पोलीस कर्मचारी चंदूलाल जायभाय, हंसराज गोरे, पोलीस नाईक अमोल लावंड तसेच वाहतूक महिला पोलीस अनिता जगताप या वेळी उपस्थित होते.