- GIS घटकाअंतर्गत संपुर्ण शहरासाठी बेसमॅप..
- पालिकेचे कामकाज पेपरलेस..
- पिंपळे सौदागरच्या लिनिअर गार्डनमध्ये तरुणांसाठी Adventure Activity…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची संचालक मंडळाची अकरावी बैठक आज शुक्रवार दि.११/१२/२०२० रोजी सकाळी ११.०० वा, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कार्यालय, ऑटोक्लस्टर चिंचवड-१९ येथे आयोजीत करण्यात आली होती. सदर बैठकीसाठी अध्यक्ष म्हणुन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांची निवड करण्यात आली.
सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते राजु मिसाळ, प्रमोद कुटे, सचिन चिखले, केंद्र शासनाच्या प्रतिनिधी ममता बात्रा, राजेंद्र जगताप, मुख्य व्यवस्थापकीय संचालक PMPML, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड हे सर्व संचालक व
श्रावण हर्डीकर, आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड सभेस उपस्थित होते. याव्यतिरीक्त सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण व राजन पाटील, मुख्य वित्तिय अधिकारी जितेंद्र कोळंबे, अशोक भालकर, जनरल मॅनेजर इन्फ्रास्ट्रकचर हे सभेस उपस्थित होते.
बैठकीत पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड कृष्ण प्रकाश (आय.पी.एस) व विरोधी पक्षनेते, राजु मिसाळ यांची नव्याने संचालक मंडळावर नियुक्त करणेत आली. तसेच जितेंद्र कोळंबे यांना मुख्य वित्तीय अधिकारी म्हणुन मान्यता देणेत आलेली आहे. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी च्या तिस-या वार्षिक सभेचे आयोजन करणेस मान्यता देणेत आलेली असुन सदर बैठक आज दि.११/१२/२०२० रोजी पार पाडण्यात आली. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड साठी तयार करणेत आलेल्या Business Plan तयार करणेत आलेला असुन सदर अहवाल संचालक मंडळपुढे सादर करणेत आला होता. अहवालाबाबत संचालक मंडळाने भविष्यातील योजनांचे Business Plan तयार करुन पुन्ह:श्च अहवाल सादर करणेबाबत सुचना दिलेली आहे.
एरिआ बेस डेव्हलपमेंट प्रकल्पाअंतर्गत Playground Improvement साठी र.रु.२५.०० कोटी बजेट करणेत आले होते. या प्रकल्पा अंतर्गत पिंपळे सौदागर भागामध्ये पी.के चौकाजवळील लिनिअर गार्डनमध्ये शहरातील तरुणांसाठी Adventure Activity करणेकामी BMX Park आणि Children’s Play Area करणेस मंजुरी दिलेली आहे.
रेनवॉटर हारवेस्टिंग प्रकल्पाअंतर्गत स्मार्ट घटक (IoT) यांचा समावेश करुन स्मार्ट रेनवॉटर हारवेस्टिंग प्रकल्प संपुर्ण शहरामध्ये राबविणेकामी मंजुरी देणेत आलेली आहे. जीआयएस आधारीत ईआरपी प्रकल्पाअंतर्गत पिं.चिं.मनपा चे कामकाज अधिक वेगाने व अचुकतेने बनविणेकामी जीआयएस, ईआरपी, वर्क फ्लो मॅनेजमेंट अशा तीन घटकांची एकत्रितपणे अंमलबजावणी होणार आहे. या तीन घटकांची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
१. ERP अंतर्गत Financial Management System, Human Resource management system, Asset management system, Inventory management system, project management system, Procurement management system असे SAP या कंपनीचे COTS Modules ची अंमलबजावणी होणार आहे.
२. GIS या घटकाअंतर्गत संपुर्ण शहरासाठी बेसमॅप बनविला जाणार आहे तसेच शहरातील मिळकतींचा डोअर- टु-डोअर सर्वे आणि आधुनिक LIDAR सर्वे केला जाणार आहे. सदर कामाचे सर्वेक्षण पुर्ण झालेनंतर शासकीय व खाजगी मालमत्तांचे मॅपिंग होणार आहे. तसेच यामुळे Property Tax Leakage चे प्रमाण कमी होणार असुन मनपाचे उत्तपन्नात भर होणार आहे.
३. Work flow Management अंतर्गत अधिकाअधिक मनपाच्या विविध पध्दती पेपरलेस बनविण्यात येणार आहे. सदर घटका मार्फत नागरीकांना घरी बसुन पिं.चिं.मनपाचा वेगवेगळ्या प्रकाराचे अर्ज करणेत येणार असुन त्यांचे लाईव्ह-स्टेटस (Real Time) बाबत माहिती उपलब्ध होणार आहे. मनपाला उपलब्ध डेटाच्या मदतीने, अहवाल सहजतेने आणि अत्यंत अचूकतेने तयार करता येऊ शकणार आहे. सदर अहवाल आणि आकडेवारी डेटा संचालित निर्णय घेण्यासाठी मदत करणार आहे. सदरचे कामकाज अंदाजीत खर्च र.र.११६.६० कोटी अपेक्षित होता. तरी, मे.Atos India Pvt Ltd. यांचा लघुत्तम दर प्राप्त झाला असुन र.रु.११२.६६ साठी कामाचा करारनामा करणेस मान्यता दिलेली आहे. सदर कामाचा अंमलबजावणीचा कालावधी दोन वर्ष असुन देखभाल व दुरुस्तीसाठी पाच वर्ष कालावधी आहे.