- शहरात १६० जणांना कोरोनाची बाधा; २९२ रुग्णांना डिस्चार्ज तर, ८ रुग्णांचा मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शुक्रवारी (दि. ११ डिसेंबर) रोजी १६० जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २९२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे ८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९४०८८ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९०७६५ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७१६ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेला ४ पुरुष रुग्ण हे किवळे (६२ वर्षे), चिखली (८५, ६३ वर्षे), नेहरूनगर (८४ वर्षे) व एक स्त्री चिंचवड (७५ वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले दोन पुरुष रुग्ण हे येरवडा (४७ वर्षे), सिंहगड रोड, पुणे (५५ वर्षे) तर एक स्त्री रावडीवाडी (७० वर्षे) येथील रहिवासी आहे.