न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०२०) :- मोशी येथील संजय गांधीनगर झोपडपट्टीतील पत्राशेडमध्ये केलेल्य कारवाईत दीड लाखांचे जुगार साहित्य जप्त केले. ९ डिसेंबरला ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
सोहेल अखील शेख (वय २७, रा. वल्लभनगर, पिंपरी), राहुल चांगदेव साळेव, गणेश गोरख उपाडे, भारत सुभाष सुधारे आणि सतीश बारकराव लोखंडे (सर्व रा. बोराडेवस्ती, मोशी), विशाल तुकाराम गायकवाड (वय २३, रा. ज्योतीबानगर, काळेवाडी), राजू सलाम शेख (वय ३२, रा. आदर्शनगर, मोशी) या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकल्यानंतर वरील सर्वजण खेळताना आढळून आले. तेथून १ लाख ६६ हजारांचे जुगार साहित्य जप्त करण्यात आले आहे.