न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०२०) :- मुलीच्या मित्राचा व्हाट्सऍप मेसेज फिर्यादी यांना आला. तुमच्या मुलीला तिचे काका अश्लील मेसेज करत आहेत. तुम्ही पाहिले नाही का? तेव्हा मुलीची आई तिच्या बेडरूममध्ये गेली. मुलीला यासंबंधी विचारले असता तिने थेट मोबाईल हातामध्ये देत त्यातील एक फोल्डर पाहण्यास सांगितले. ज्यात तिच्या चुलत्याने अश्लील मेसेज केले पाहायला मिळाले. तो पर्यंत मुलगी दुसऱ्या रूमच्या गॅलरीत गेली आणि तिथून उडी घेतली.
घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली होती. मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच दरम्यान सात सप्टेंबर २०२० रोजी घरातील काम आवरत असताना फिर्यादी यांना मयत मुलीने लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यात काका हे अश्लील मेसेज करत असून जवळीक साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला असल्याचे म्हटले आहे. १७ सप्टेंबर रोजी अल्पवयीन मुलीचा दहा दिवसांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या घटनेला होऊन तीन महिने उलटले असून या सर्व धक्क्यातून सावरल्यानंतर शुक्रवारी भोसरी पोलीस ठाण्यात चुलत चुलत्या विरोधात मुलीच्या आईने तक्रार दिली आहे.














