न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०२०) :- फिर्यादी यांचे मित्र राजेश नायक (रा. कोथरुड) यांचे घरसामान व दुचाकी हे कोथरुड येथून मेंगलोर येथे पोहोच करायचे होते. त्यासाठी व्हीआरएल कार्गो इंडिया पॅकर या कंपनीच्या वेबसाईटवरून त्यांनी सोनू चाैधरी याच्याशी संपर्क साधला. नायक यांचे साहित्य पुणे येथून मेंगलोर येथे पोहोच करण्यासाठी ११ हजार रुपये भाडे ठरविले.
त्यासाठी नायक यांनी आठ हजार रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर आरोपी याने नायक यांचे एक लाख ६० हजार रुपयांचे साहित्य कोथरुड येथून घेतले मात्र मेंगलोर येथे पाहोच केले नाही. साहित्य पाहिजे असल्यास ठरलेल्या रकमेपेक्षा आणखी नऊ हजार रुपये मागितले. टेम्पोच्या चालकास ताब्यात घेऊन पोलिसांनी चाैकशी केली. त्यानंतर निगडीतील ट्रान्सपोर्ट नगर येथून आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपीकडून १० हजारांचा मोबाईल, नायक यांचे एक लाख ६० हजारांचे घरगुती साहित्य व दुचाकी जप्त केली. विरेंद्रकुमार रामकिशन पुनिया (वय २५, रा. निगडी, मूळ रा. राजस्थान), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आशिष शिवाजीराव गावडे (वय ४३, रा. कर्वेनगर, पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली.














