- आज १८० जणांना कोरोनाची बाधा; २६७ रुग्णांना डिस्चार्ज तर, २ रुग्णांचा मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. १२ डिसेंबर) रोजी १८० जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २६७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे २ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९४२६८ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९१०३२ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७१६ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले दोन पुरुष रुग्ण हे आंबेगाव (८० वर्षे), तळेगाव ढमढेरे (७८ वर्षे) येथील रहिवासी आहे.














