तलाठ्याकडील १ ते २१ नमुन्यांची सुविधा ऑनलाईन होणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ डिसेंबर २०२०) :- ऑनलाईन सातबारा, फेरफार आणि ऑनलाईन आठ ‘ अ ‘ उपलब्ध करून देण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शासनाने आता संपूर्ण तलाठी दप्तरच ऑनलाईन करण्याचा अभिनव प्रयोग हाती घेतला आहे. या अंतर्गत तलाठ्याकडे येणारे सर्व १ ते २१ नमुन्यांची सुविधा ऑनलाईन करणार आहेत.
महसूल विभागात सर्वात महत्वाचा दुवा व थेट लोकांशी संपर्क असलेला घटक म्हणून तलाठ्यांकडे पाहिले जाते. तलाठी कार्यालयाकडे वेगवेगळ्या प्रकारच्या २१ नमुन्यांची माहिती ठेवलेली असते. यामध्ये गाव नमुना क्रमांक एक ते २१ असतात. त्यापैकी सातबारा, आठ ‘अ’ आणि फेरफार उतारे यांचा संबंध हा नागरिकांशी येत असतो.
यामुळे लोकांना अनेक सुविधा घर बसल्या मिळणार असून, तलाठ्यांची कामे देखील सोपी होणार आहेत. पैशाचा हिशोब ऑनलाईन होईल, खातेदारांची मागणी ताळमेळ सोपा होईल, अशी माहिती रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक ई – सातबारा प्रकल्प यांनी दिली.