- आज ९५ जणांना कोरोनाची बाधा; १३२ रुग्णांना डिस्चार्ज तर, ६ रुग्णांचा मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज सोमवारी (दि. १४ डिसेंबर) रोजी ९५ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १३२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे ०६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९४५३२ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९१२७६ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७२० जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष – थेरगांव (५६ वर्षे), भोसरी (६४ वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०४ पुरुष – जुन्नर (९० वर्षे), मुंबई (६७ वर्षे), हिंजवडी (७५ वर्षे), शिरोली (६२ वर्षे) येथील रहिवासी आहेत.














