- अध्यक्षपदी विजयकांत कोठारी तर, कार्याध्यक्षपदी प्रकाश पारख यांची निवड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२०):- महावीर प्रतिष्ठानची कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून शहरातील प्रतिष्ठित जैन समाजाच्या पदाधिकाऱ्यांची देखील कार्यकारिणीवर निवड करण्यात आली आहे.
संस्थेच्या अध्यक्षपदी सकल जैन समाजाचे नेते विजयकांत कोठारी आणि कार्याध्यक्षपदी प्रसिद्ध उद्योजक प्रकाश पारख, उपाध्यक्षपदी अखिल भारतीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस छाजेड (उपाध्यक्ष), उद्योजक लखिचंद खिंवसरा (उपाध्यक्ष), पन्नालाल लुणावत (कोषाध्यक्ष), संजय छाजेड (महामंत्री), विजय भटेवरा (सहमंत्री) यांची कार्यकारिणीत निवड झाली.
कार्यकारिणी सदस्य कुंदन दर्डा, राजेंद्र गुगळे, फुलचंद बाठिया, अरुण शिंगवी, विजय भंडारी, मोहनलाल संचेती, सुभाष ललवाणी, जवाहर बोथरा, आदेश खिंवसरा आदी उपस्थित होते. मावळते अध्यक्ष दीपचंद पारख यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.