न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२०):- मूळ मालकाच्या परस्पर चौघांनी मिळून बनावट कागदपत्रे तयार करून त्याआधारे ऑडी ही अलिशान कार विकली. कार खरेदी करणारे आणि मूळ मालक यांनी चर्चा करून पोलिसात धाव घेतली. मालेश सुरेश गावडे (वय ४२, रा, टाटा मोटर्स समोर, चिंचवड) यांनी रविवारी (दि. १३) याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी शाम शिंदे, रेणुका जैन, प्रशांत गायकवाड आणि एक अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी फिर्यादी यांना फिर्यादी यांच्या नावावर आयसीआयसीआय बँकेचे कर्ज काढून त्यांना ऑडी कार घेऊन दिली होती. फिर्यादी यांच्या परस्पर आरोपींनी ती कार गहाण ठेवली. त्यानंतर फियांदी यांच्या नावाचे बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड, बँकेचे लोन क्लिअरन्स सर्टीफिकेट तयार केले.
आरटीओ फॉर्मवर फिर्यादी यांच्या बनावट सह्या करून फिर्यादी यांच्यासारखा दिसणारा व्यक्ती उभा करून कार विकली. याबाबत कार खरेदी करणारे संजय लडकत आणि फिर्यादी यांनी चर्चा करून पोलिसांकडे तक्रार केली आहे.











