- अनोख्या ट्रिकने बेशिस्त वाहनचालकांकडून पैसे वसुली?
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०२०) :- पिंपरीतील साई चाैक व शगुन चौकात वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत होती. या कारवाई दरम्यानची एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
एका दुचाकीवरील दोन महिलांना वाहतूक पोलिसांनी अडविले. त्यापैकी एक तरुणी तेथील महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या जवळ येते. महिला पोलीस त्या तरुणीला सूचना देते.
त्यानंतर तरुणी पुन्हा महिला पोलिसाजवळ येते. त्यावेळी महिला पोलीस तिला पाठमोरी होते. सूचनेप्रमाणे तरुणी महिला पोलिसाच्या मागच्या खिशात पैसे ठेवत असल्याचे क्लिपमध्ये दिसून येते.














