- पालिका आवारात बनला चर्चेचा विषय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेत गेल्या आठवड्यात भाजपातील चिंचवड विरुद्ध भोसरी गटबाजी चव्हाट्यावर आली होता. वाकडच्या विकासकामांवरून स्थायी समितीच्या सभेत भाजपातील गटबाजी समोर आली होती.
चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप समर्थक सहा सदस्यांनी गोंधळ, राडा घातला. सभागृहातील माईक, फोन आदी साहित्याची फोडतोड केली, त्यामुळे सत्ताधारी भाजपातील सदस्यांमध्ये चांगलीच जुंपली होती.
त्यामुळे आजच्या सभेत भांडणे होणार असल्याचे समजल्याने विरोधी पक्षांतील सदस्य हेल्मेट घालून आले होते. विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य मयूर कलाटे, सुलक्षणा धर, पंकज भालेकर, पौर्णिमा सोनवणे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे हे हेल्मेट घालून आले होते. मात्र, सभेत कोणताही वाद झाला नाही.














