न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसें.) :- दिवंगत माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहर भाजपातर्फे त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून मुंडे यांना आदरांजली वाहण्यात आली. भाजपाच्या मोरवाडी येथील कार्यालयात बुधवारी (दि. १२) रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप, महेश कुलकर्णी, उमा खापरे, एकनाथ पवार, अमोल थोरात, बाबू नायर, बाबू नायर,शीतल शिंदे, केशव घोळवे, राजेश पिल्ले, शैला मोळक, रेखा कडाली, संजीवनी पांड्ये, शोभा भराडे, वैशाली खाड्ये, आर.एस.कुमार, राजू सावंत, राजू दुर्गे, अजय पाताडे, प्रमोद ताम्हणकर, विकास मिश्रा, दीपक कुलकर्णी, संतोष तापकीर, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, गोपीनाथ मुंडे जनाधार लाभलेले नेते होते. त्यामुळेच लोकनेते म्हणून त्यांची ओळख होती. तरुणांनी नेतृत्व करावे, अशी त्यांची भूमिका होती. त्यासाठी ते प्रत्येकवेळी तरुणांना संधी देत असत. पिंपरी-चिंचवडमध्येही त्यांनी भाजपाची बांधणी केली. त्यामुळे येथे भाजपा रुजली. पिंपरी-चिंचवडकरांनी भाजपाच्या हाती सत्ता देऊन त्यांचे स्वप्न साकार केले. त्यांनी दाखविलेल्या मार्गावरून वाटचाल करायची आहे. त्यामुळे सर्वसामान्य घटकाची प्रगती होऊन शहराचा सर्वांगीण विकास होईल. तीच त्यांना ख-या अर्थाने आदरांजली राहील.
अमोल थोरात, एकनाथ पवार यांच्यासह काही मान्यवरांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे या वेळी पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते या वेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. शहरातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












