- क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह उपायुक्त, सहायक आयुक्त, प्रशासन अधिकाऱ्यांचा समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ डिसेंबर २०२०) :- महापालिकेतील उपायुक्त, सहायक आयुक्त आणि प्रशासन अधिकाऱ्यांच्या कामकाजाचे फेरवाटप आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. बढती मिळालेल्या उपायुक्तांकडील क्षेत्रीय कार्यालयांचा भार कमी केला आहे. पिंपरी – चिंचवड महापालिका सेवेतील चार आणि राज्य प्रतिनियुक्तीवरील दोन सहायक आयुक्तांना उपायुक्तपदी नुकतीच बढ़ती दिली. तर, राज्य प्रतिनियुक्तीवरील दोन उपायुक्त महापालिकेत कार्यरत आहेत.
प्रशासन अधिकारी संवर्गातील तीन अधिकाऱ्यांना सहायक आयुक्तपदी बढती दिली आहे. या बढत्यांच्या पार्श्वभूमीवर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रशासकीय सोईसाठी अधिकाऱ्यांच्या कामकाजाचे फेरवाटप आहे. सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांच्याकडे आकाशचिन्ह व परवाना विभागासह निवडणूक, प्रशांत जोशी यांच्याकडे भूमी आणि जिंदगी, माहिती व जनसंपर्क विभाग, अण्णा बोदडे यांच्याकडे ‘ क ‘ क्षेत्रीय कार्यालय, जनगणना, नागरवस्ती विभागाकडील दिव्यांग कक्षाचे कामकाज सोपविले आहे.
प्रशासन अधिकारी सिताराम बहुरे यांच्याकडे फ क्षेत्रीय कार्यालयाचा अतिरिक्त पदभार सोपविला आहे. दिलीप आढारी यांच्याकडे करसंकलन मुख्य कार्यालय, तर वामन नेमाणे यांना प्रशासन विभागात नेमणूक दिली आहे. अवधूत तावडे यांच्याकडे ई क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रीय अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार दिला आहे. सोनम देशमुख यांच्याकडे ब क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार, सुचिता पानसरे यांच्याकडे ‘ अ ‘ क्षेत्रीय कार्यालयाचा अतिरिक्त पदभार, अभिजीत हराळे यांच्याकडे ‘ ह ‘ क्षेत्रीय कार्यालयाचा अतिरिक्त पदभार, राजेश ठाकर यांच्याकडे ‘ ग ‘ क्षेत्रीय कार्यालय प्रशासन अधिकारीपदाची जबाबदारी सोपविली आहे.
कार्यालयीन अधीक्षकांकडे कार्यालयीन अधिक्षक नाना मोरे यांच्याकडे ‘ क ‘ क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रशासन अधिकारी पदाची अतिरिक्त जबाबदारी दिली . प्रभारी प्रशासन अधिकारी परशुराम वाघमोडे यांच्याकडे बांधकाम परवानगी , अनधिकृत बांधकाम परवानगी विभागासह स्थानिक संस्था कर विभागाच्या प्रशासन अधिकारीपदाचा भार सोपविला आहे. उपायुक्त स्मिता झगडे यांच्याकडील क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार कमी केला. तर ग प्रभागाच्या क्षेत्रीय आयुक्तपदी श्रीनिवास दांगट यांची नियुक्ती केली. चंद्रकांत इंदलकर यांच्याकडे कामगार कल्याण व कायदा सल्लागार या पदाचा अतिरिक्त पदभार सोपविला आहे. संदीप खोत यांच्याकडे क्रीडा विभागाची जबाबदारी दिली. सहायक आयुक्त सुनील अलमलेकर यांच्याकडे स्थानिक संस्था कर विभागाचे कामकाज दिले आहे. प्रशासन अधिकारी राजेश आगळे यांना सहाय्यक आयुक्तपदी बढती दिली. प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त म्हणून अतिरिक्त कामकाज सोपविले आहे.


















