- सात लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त; अनेक गुन्हे उघडकीस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ डिसेंबर २०२०) :- एक सराईत गुन्हेगार नाशिक फाटा येथे चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा लावूून विधीसंघर्षग्रस्त बालकाला चोरीच्या मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतले.
तसेच त्याचा साथीदार आरोपी राठोड तेथून पळून गेला. विधीसंघर्षग्रस्त बालकाने त्याचे साथीदार आरोपी राठोड, जाधव, मांझी व तांगतोडे यांच्यासह घरफोडी व वाहनचोरीचे नऊ गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले. यातील चार गुन्हे भोसरी पोलीस ठाणे तर पाच गुन्हे निगडी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून चोरीचे ६६ ग्रॅम सोन्याचे, २८ ग्रॅम चांदीचे दागिने, चार एलसीडी टीव्ही, तीन दुचाकी, एक लॅपटाॅप, एक टॅब, एक मोबाईल फोन, चार मनगटी घड्याळे, गॅस सिलेंडर व शेगडी, असा एकूण सात लाख ६८ हजार ५५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी विधीसंघर्षग्रस्त बालकासह त्याचे साथीदार असलेले किरण गुरुनाथ राठोड, शेखर संभाजी जाधव, विकी कमल मांझी (सर्व रा. भोसरी), कृष्णा उर्फ बाॅबी संजय तांगतोडे (रा. नाशिक) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी हे रेकाॅर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत.पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने ही कारवाई केली.


















