न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ डिसेंबर २०२०) :- राज्य सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य मोहिमेअंतर्गत आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागामार्फत गर्भवतींच्या सक्षमीकरणासाठी ‘ लक्ष्य ‘ उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे.
त्यामुळे याठिकाणी लेबर रूमसह ऑपरेशन थिएटर, अत्याधुनिक टेबल, बेड, स्तनपान कक्षासह संपूर्ण प्रसूती कक्षाचा कायापालट होणार आहे. नवजात अर्भक मृत्यू आणि माता मृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी हा उपक्रम उपयोगी ठरणार आहे.